शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Sachin Sawant : "भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी"; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:38 AM

Congress Sachin Sawant slams BJP and Narendra Modi : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांच्या इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीतील प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. "‘घमंडिया’ आघाडी घराणेशाहीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, लोकनायक जयप्रकाश, डॉ. लोहिया यांनी घराणेशाहीवर उघड टीका केली."

"घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहिले. काँग्रेसला घराणेशाही आवडते" अशी टीका पंतप्रधानांनी केली. याला आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मणिपूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. "महिलांवर बलात्कार, हजारो घरं जाळली व २ तास १४ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान २ मिनिटं मणिपूरबद्दल बोलतात‌. भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी आहे" असं म्हणत घणाघात केला आहे. 

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "शेकडो मेली, ५०००० पेक्षा जास्त स्थलांतरित, शेकडो महिलांवर बलात्कार, हजारो घरे जाळली व २ तास १४ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान २ मिनिटे मणिपूर बद्दल बोलतात‌. मणिपूर मध्ये भाजपाचे दोन खासदार असूनही एकालाही बोलून दिले जात नाही. भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी आहे" असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी "काँग्रेस अहंकारात इतकी चूर आहे की त्यांना जमीन दिसत नाही. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, त्रिपुरा, ओडिशा, नागालँड, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १९६२ पासून आजवर लोकांनी काँग्रेसवर अविश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या सामर्थ्यावर काँग्रेस आणि मित्रपक्षांचा कधीच विश्वास राहिला नाही" असं म्हटलं आहे. 

"लाल किल्यावरून देशाला संबोधताना शौचालय, जनधन खाते, योग, आयुर्वेद, स्टार्टअप इंडिया, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया अशा सर्व गोष्टींची त्यांनी खिल्ली उडविली. त्यांचा भारताच्या सैन्यापेक्षा शत्रूंच्या दाव्यांवर, पाकिस्तान, हुरियत, पाकिस्तानचा झेंडा घेणाऱ्यांवर आणि फुटिरवाद्यांवर विश्वास होता. २०२८ मध्ये पुन्हा या सातत्याच्या जोरावर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. देशाचा विश्वास २०२८ साली जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव मांडाल तेव्हा हा देश पहिल्या तीनमध्ये असेल" असा टोला मोदींनी लगावला. 

टॅग्स :congressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार