शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:59 IST

Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.

महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. 

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी

महाराष्ट्रातील मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात सर्व पीडित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. सरकार आणि प्रशासनाला मदतकार्याला गती देण्याचे आणि पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचे आवाहन करत आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, मराठवाड्यात जो आलेला महाप्रलय आहे, मराठवाड्यात जे अस्मानी संकट आले आहे. सातत्याने दोन ते तीन दिवस झालेला प्रचंड पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला शेतकरी, नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Urges Maharashtra Govt to Fully Aid Flood-Hit Farmers

Web Summary : Rahul Gandhi appealed to the Maharashtra government to expedite assistance to flood-affected farmers in Marathwada. He urged assessment of crop damage and full support. Congress workers are asked to cooperate with administration.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस