Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:59 IST2025-09-25T19:59:47+5:302025-09-25T19:59:52+5:30
Rahul Gandhi on Maharashtra Flood: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
Rahul Gandhi on Maharashtra Flood: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.
महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी
महाराष्ट्रातील मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात सर्व पीडित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. सरकार आणि प्रशासनाला मदतकार्याला गती देण्याचे आणि पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचे आवाहन करत आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मराठवाड्यात जो आलेला महाप्रलय आहे, मराठवाड्यात जे अस्मानी संकट आले आहे. सातत्याने दोन ते तीन दिवस झालेला प्रचंड पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला शेतकरी, नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र के मराठवाड़ा में भारी बारिश के कारण जनहानि और बड़े पैमाने पर फसलों के नुक़सान की ख़बर बेहद दुखद है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 25, 2025
इस मुश्किल वक्त में मेरी संवेदनाएं सभी प्रभावित परिवारों के साथ हैं।
सरकार और प्रशासन से अपील है कि राहत कार्यों में तेजी लाई जाए और फसलों की बर्बादी का आकलन करके…