कंत्राटी पोलिस भरतीला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:26 IST2023-10-13T10:24:50+5:302023-10-13T10:26:17+5:30
कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय सरकारने पोलिस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास काढून घेतला आहे.

कंत्राटी पोलिस भरतीला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध
मुंबई : मुंबई पोलिस दलात ३ हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला असून हा निर्णय बेरोजगारांचे शोषण करण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.
कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय सरकारने पोलिस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास काढून घेतला आहे. कंत्राटी तहसीलदारांच्या भरतीचा विषय ताजा असतानाच कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय घेऊन या सरकारने आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या पोलिसांची विश्वासार्हता आदींबाबत सरकारने विचार केला आहे का, ही शंकाच असल्याचे म्हटले आहे.