शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 12:36 IST

'कृष्णकुंज'वर सध्या लगीनघाई सुरू आहे. पण, राजकीय वर्तुळात काँग्रेस-मनसेच्या मनोमीलनाची चर्चा

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं शुभमंगल येत्या २७ जानेवारीला होतंय. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. त्यामुळे 'कृष्णकुंज'वर सध्या लगीनघाई सुरू आहे. पण, राजकीय वर्तुळात काँग्रेस-मनसेच्या मनोमीलनाची चर्चा रंगलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या महाआघाडीशी गाठ बांधण्याचा प्रयत्न या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होऊ शकतो, अशी कुजबूज ऐकू येतेय. ही चर्चा म्हणजे, संक्रातीच्या मुहूर्तावर सुरू असलेली पतंगबाजी असल्याचं मनसेची मंडळी म्हणताहेत, तर काही जण 'आमंत्रणातील राजकारणा'कडे बोट लक्ष वेधत आहेत.राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उघडलेली 'व्यंगचित्र मोहीम' सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय. या सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. या आवाहनातच, महाआघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव-होकारही दडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्यानं महाआघाडीशी 'इंजिन' जोडलं जाणं तसं कठीण नव्हतं. परंतु, काँग्रेस नेत्यांनी 'हात' मागे घेतले आणि 'टाळी' चुकली. परप्रांतीयांविरोधातील मनसेची 'खळ्ळ-खटॅक' भूमिका काँग्रेसला मान्य नाही. हा वर्ग काँग्रेसचा मतदार असल्यानं मनसेला सोबत घेणं आपल्याला महाग पडू शकतं, असं महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं ठाम मत आहे. मुंबई-महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि राज ठाकरे यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकीही झाल्यात. त्यामुळे महाआघाडीचा मार्ग राज यांच्यासाठी थोडा कठीणच आहे. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंनी चिरंजीव अमितच्या लग्नासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिलेलं आमंत्रण सूचक मानलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी पत्रिका पाठवलेली नाही. पण, सोनिया-राहुल यांना आग्रहाचं निमंत्रण केलंय. हे त्यांनी मनोमीलनासाठी टाकलेलं एक पाऊल तर नाही ना, असं बोललं जातंय. थेट 'हायकमांड'नेच आदेश दिल्यास महाआघाडीची दारं मनसेसाठी सहज उघडली जाऊ शकतात, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. मात्र त्याचवेळी, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नेतेमंडळी एकमेकांकडे लग्न सोहळ्याला गेल्याची उदाहरणं दाखवून मनसेचे शिलेदार ही Marriage Diplomacy ची शक्यता फेटाळून लावत आहेत.

शरद पवारांचं 'साधं-सरळ' गणितमोदी सरकारविरोधात महाआघाडीची घडी बसवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शरद पवार यांना मनसेची ताकद नेमकी ठाऊक आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालं नसलं, तरी त्यांना मतदान करणारा एक वर्ग आहे. शिवसेनेची मतं मनसे फोडू शकते आणि त्याचा फटका - युती झाल्यास भाजपालाही बसू शकतो. पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी हे गणित फायद्याचं ठरू शकतं, असं पवारांचं समीकरण आहे. ते काँग्रेसला पटतं का आणि 'राज'कारणाला वेग येतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र