शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 12:24 PM

शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे.

मुंबई: राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत सत्तास्थापन केली आहे. मात्र वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या या पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्तापासूनच आपल्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रविवारी सामनामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू व वि.दा. सावरकर यांच्याबद्दल लिहलेल्या लेखावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सामनाच्या 'रोखठोक'मधून आपले मत मांडताना संजय राऊत म्हणाले होते की, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दलही अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या; पण वीर सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेलांच्या वाट्याला आल्या नसल्याचे राऊत म्हणाले होते.

त्यांच्या या भूमिकेनंतर निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "सावरकरांच्या बचावात शिवसेनेला काय भूमिका घ्यायची त्यांनी ती घ्यावी. मात्र स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चन्द्र बोस यांचे अपमान करू नयेत" असे ट्वीट करत निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली.

तर सामानातून आलेल्या लेखातून स्वातंत्र्य सैनिकांबद्दलची शिवसेनेची भूमिका जाणवत असून त्यांची ही भूमिका घातक आहे. तर शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे.