शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; पुढील सुनावणी ४ एप्रिलला 

By नितीन पंडित | Updated: February 21, 2026 13:57 IST

राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: आर एस एस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात हजर झाले.या प्रकरणात राहुल गांधी यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी एम कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते.यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.

कुणालाही न भेटताच राहुल गांधी निघाले
राहुल गांधी भिवंडी न्यायालयात येणार असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी न्यायालयात व परिसरात हजर होते मात्र राहुल गांधी कुणालाही न भेटता राहुल गांधी भिवंडी न्यायालयातून निघून गेले.

१५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर
राहुल गांधी यांच्या प्रकरणाची सुनावणी शनिवारी पावणे अकरा वाजता होती.मात्र ते १५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.
राहुल गांधी नेहमीच न्यायालयाचा आदर करतात,त्यामुळे ते पंधरा मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.जामिनीच्या बॉण्डवर सह्या व इतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते निघून गेले अशी माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.

भिवंडीत चोख बंदोबस्त
राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणे आवश्यक होते. त्यानुसार राहुल गांधी यांना पुन्हा न्यायालयात सुनावणीसाठी याव लागल. न्यायव्यवस्थेपेक्षा दुसर काही मोठ नाही, हे न्यायालयाने आज सिद्ध केल आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण
२०१४ च्या लोकसभा निवडणुक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी 'महात्मा गांधी हत्येमागे आर.एस.एस. या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात आर एस एस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल खाजगी फिर्याद दाखल केली आहे.

काळे झेंडे दाखविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
मुलुंड टोल नाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे अत्यंत निंदनीय आहे.राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे.अशा परिस्थितीत त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे आहे.याठिकाणी काहीही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.त्यामुळे सरकारचा व पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली.त्यांच्या सोबत उपमहापौर तारिक मोमीन यांनी देखील या घटनेचा निषेध केला.

मानहानीच्या खटल्याला बारा वर्षे लागणे दुर्दैवी- खा.बाळ्या मामा

२०१४ चा मानहानीचा खटला आता २०२६ पर्यंत सुरु आहे , मानहानीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर निकाली लावणे गरजेचे आहे.मात्र या खटल्याला बारा वर्षे लागली हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Appears in Bhiwandi Court; Next Hearing on April 4

Web Summary : Rahul Gandhi appeared in Bhiwandi court for an RSS defamation case hearing, providing a new surety after the previous one passed away. The next hearing is scheduled for April 4. He did not meet with any Congress workers. A BJP protest was condemned.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी