शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 5:59 PM

देशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणा

ठळक मुद्देदेशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणाकेंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता, पटोलेंचं वक्तव्य

"महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि इतर देशांना लस पाठवत आहेत. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला आहे. त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. "केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आले. पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपुरच्या आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपूरातच कोरोना रुग्ण संख्या कशी काय वाढू लागली असा प्रश्न उपस्थित करत पुलावामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन तसेच नागपुरात कोरोना का वाढतो याचे कनेक्शन काय आहे," अशी विचारणा पटोले यांनी केली.

रश्मी शुक्ला प्रकरणीही भाष्य"अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतळी बनू नये, त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमवीरसिंह व रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजपा व फडणवीस यांची खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका राहिली असून सुशांतसिंह प्रकरण असो वा परमबीर सिंग प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे असेही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानRashmi Shuklaरश्मी शुक्लाParam Bir Singhपरम बीर सिंग