शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी श्रेष्ठींच्या नाराजीची, तर आता पटोले यांच्या समर्थनाची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 09:09 IST

तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण.

ठळक मुद्देतणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण.भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण हे त्यांचे त्यांनी ठरवावे, वडेट्टीवारांची टीका.

मुंबई : एखादे चुकीचे मत पुढे आले, तर महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल. त्यामुळे तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील. जर काही कुरबुरी झाल्यात, तर काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोघे संवाद साधण्याचे काम करतील, या शब्दांत काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी मंगळवारी नाना पटोले यांची पाठराखण केली. मात्र, वादग्रस्त विधाने कोणीच करू नयेत, अशी भूमिकाही मांडली.

सोमवारी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत, असे सांगत होते. मात्र, मंगळवारी ‘लोकमत’मध्ये ‘नाना पटोले यांना राहुल गांधी यांचा वरदहस्त’ अशी बातमी प्रकाशित झाली आणि पत्रकार परिषदेत सगळ्याच नेत्यांनी पटोले यांची पाठराखण केली. जो काही वाद निर्माण झाला त्याचे खापर पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी माध्यमांवर फोडले. पटोले यांचे विधान मोडतोड करून माध्यमांनी दाखवले. पटोले यांच्या बोलण्याचा रोख केंद्र सरकारवर होता. आता हा विषय पूर्णपणे संपला आहे, असेही पाटील म्हणाले. 

काँग्रेसने महागाईच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक भाजप अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहे, असा आरोप खुद्द पटोले यांनी केला. अन्य नेत्यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आहेत. ज्या पद्धतीने भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यातून भाजपचा डाव स्पष्ट दिसून येतो, असा आरोपही पटोले यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरणाची अंमलबजावणी करताना पोरखेळ केला आहे, असा आक्षेप नोंदवला. 

भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण? भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण हे त्यांचे त्यांनी ठरवावे. त्यांचीच सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव आणि अंगणही त्यांचेच, त्यामुळे महाभारतही तिकडेच आहे. ते त्यांनाच लखलाभ राहो, अशी टीका मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात