“कोणाला-कोणाची गरज आहे, ते भाजपा अन् संघाने आपापसात ठरवावे”; काँग्रेसचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:24 IST2026-02-09T18:22:48+5:302026-02-09T18:24:35+5:30

Congress Harshwardhan Bawankule News: भाजपा सत्तेत आल्यानंतर संघाचे 'अच्छे दिन' आले, असे नाही, तर नेमके याच्या उलट आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

congress harshwardhan sapkal said bjp and rss should decide among themselves who needs whom | “कोणाला-कोणाची गरज आहे, ते भाजपा अन् संघाने आपापसात ठरवावे”; काँग्रेसचा खोचक टोला

“कोणाला-कोणाची गरज आहे, ते भाजपा अन् संघाने आपापसात ठरवावे”; काँग्रेसचा खोचक टोला

Congress Harshwardhan Bawankule News: भाजपा सत्तेत आल्यानंतर संघाचे 'अच्छे दिन' आले, असे नाही, तर नेमके याच्या उलट आहे. आम्ही एक विचार आणि तत्व घेऊन पुढे जातो. ज्यांनी त्या विचारांचा पुरस्कार, स्वीकार केला त्यांना निवडणुकीत त्याचा आपोआप लाभ झाला. आम्ही राम मंदिरच्या बाजूने उभे राहिलो. ज्यांनी आमचे विचार स्वीकारले त्यांना राजकीय लाभ झाला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळीच्या नेहरू सेंटर येथे 'संघ परिवाराची १०० वर्षे नवे क्षितिज' या विषयावर भागवत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे, असा २ दिवसीय कार्यक्रम झाला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे. 

भाजपाचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांनी भाजपाला संघाची आवश्यकता नाही असे म्हटले होते, त्याला भागवत यांनी प्रत्तुत्तर दिले असेल.  कोणाला, कोणाची गरज आहे हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपसात ठरवावे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

विमान अपघातावरील संशय दूर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूने अनेकांच्या मनात आजही संशय आहे. अपघाताला १० दिवस झाले तरी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, त्यामुळे संशय बळावणे स्वाभाविक आहे. दृष्यमानता नसल्याने विमान अपघात झाल्याचे सांगितले जात होते पण त्यानंतर अनेक बाबी समोर येत आहेत पण या अपघाताकडे गांभीर्याने पाहात नाहीत, असे दिसते, असे सपकाळ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला, असेही ते म्हणाले.

 

Web Title : कांग्रेस का भाजपा पर तंज, किसे किसकी जरूरत, संघ तय करे।

Web Summary : कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल ने भाजपा और आरएसएस की आलोचना करते हुए कहा कि वे आपस में तय करें कि किसकी जरूरत किसे है। उन्होंने अजित पवार के विमान हादसे की जांच पर भी चिंता जताई और स्थानीय चुनावों में कांग्रेस के स्वतंत्र रुख पर जोर दिया।

Web Title : Congress taunts BJP, RSS should decide who needs whom.

Web Summary : Congress leader Harshwardhan Sapkal criticized BJP and RSS, suggesting they internally decide their mutual needs. He also raised concerns about the Ajit Pawar plane crash investigation and emphasized Congress's independent approach in local elections, highlighting the positive response to their ideology.