चौकीदारांच्या राजवटीत आर्थिक घोटाळे वाढले; काँग्रेसची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 15:18 IST2020-02-05T15:07:17+5:302020-02-05T15:18:44+5:30
गेल्या तीन वर्षात फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे भाजप सरकारने कबूल केले आहेत.

चौकीदारांच्या राजवटीत आर्थिक घोटाळे वाढले; काँग्रेसची भाजपवर टीका
मुंबई : देशातील घोटाळ्यांची संख्या वाढत असल्याचे आरोप करत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. तर चौकीदारांच्या राजवटीत आर्थिक घोटाळे वाढले असल्याचा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.
काँग्रेसने ने म्हंटले आहे की, गेल्या तीन वर्षात फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे भाजप सरकारने कबूल केले आहेत. तर यात बँका आणि वित्तीय संस्थांमधील घोटाळ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमध्ये आर्थिक बेशिस्त वाढलेली आहे. त्याचबरोबर या सरकारला आर्थिक घोटाळे रोखण्यातही अपयश आलेले दिसते. ठोस कारवाईच्या अभावी वित्तीय संस्थांमधील घोटाळ्यांना पायबंद घालण्यात सरकार कुचकामी ठरले असल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसने केला आहे.
तर 2016 ते 2017 मध्ये 23 हजार 974 कोटींचे घोटाळे झाले आहेत. 2017- 18 च्या काळात 41 हजार 167 कोटींचा एकूण घोटाळा झाला होता. त्याचप्रमाणे 2018- 19 मध्ये 71 हजार 543 तर 2019-20 काळात 1 लाख 13 हजार 374 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.