रेलरोकोदरम्यान काँग्रेस नगरसेविकेचे डोके फुटले

By Admin | Updated: June 25, 2014 12:40 IST2014-06-25T12:40:34+5:302014-06-25T12:40:45+5:30

रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की होऊन काँग्रेसच्या नगरसेविकेचे डोके फुटले.

Congress corporator's head split between railroad | रेलरोकोदरम्यान काँग्रेस नगरसेविकेचे डोके फुटले

रेलरोकोदरम्यान काँग्रेस नगरसेविकेचे डोके फुटले

>ऑनलाइन टीम
सोलापूर, दि. २५ -  रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या नगरसेविकेचे डोके फुटून त्या जखमी झाल्या आहेत. सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान फोटो काढताना काँग्रेस कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा नडला आणि धक्काबुक्की होऊन नगरसेविका सुशीला आबुटे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

Web Title: Congress corporator's head split between railroad