शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

करणची 'मुश्किल' दूर, मनसेची 'सशर्त' माघार

By admin | Updated: October 22, 2016 15:47 IST

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटाचा प्रदर्शनाचा अखेर मार्ग मोकळा झाला असून राज ठाकरेंच्या मनसेने चित्रपट प्रदर्शनला ' सशर्त' परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेला करण जोहर दिग्दर्शित  ' ए दिल है मुश्किल' या चित्रपटाचा प्रदर्शनाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. मनसेने काही अटींवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला असलेला विरोध मागे घेतला आहे. 
 
यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लिहून द्या अशी अट आपण दिग्दर्शक- निर्मात्यांपुढे ठेवली व त्यांनी ती मान्य केली आहे असे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  
 
(यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्र)
('ए दिल...'वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थ)
 
  • जे निर्माते पाकिस्तानी कलावंतांना घेऊन चित्रपट बनवत आहेत त्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडासाठी मनोहर पर्रिकर यांच्याकडे जमा करावेत अशी आपली मागणी आहे असे राज यांनी सांगितले.  
  • मनसेने यापूर्वीही पाक कलाकारांना विरोध दर्शवला आहे, त्यामुळे हा मनसेच्या आंदोलनाचाच विजय असल्याचा दावा करत 'ए दिल' चित्रपट कोणी पाहील असं मलातरी वाटत नाही, असे राज यांनी सांगितले. आतापर्यंत पाकिस्तानने आपले चॅनेल्स आणि चित्रपट कसे बॅन केले, आपल्या कलाकांरांच्या कार्यक्रमाला कसा विरोध दर्शवला, हे आपण पाहिलंच आहे मग त्यांच्यासाठी रेड कार्पेट का अंथरता ? असा सवाल राज यांनी विचारला.