मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:58 PM2020-09-23T19:58:42+5:302020-09-23T20:54:47+5:30

मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली..

'Concession' is an apologetic attempt of the government to quell the outbreak of Maratha community: Praveen Darekar | मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गात पुणे क्रमांक एकवर असणे हे क्लेशदायीशिवसेनेने मुंबईची तुंबई करुन दाखवली

पुणे : मराठा समाजाला राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या ज्या सवलती देऊ केल्या आहेत, त्या सवलती म्हणजे मराठा समाजाचा उद्रेक व असंतोष क्षमविण्यासाठी आम्ही काही तरी करत आहोत, हे दाखविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
    नाबार्डच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतल्यानंतर दरेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजासाठी भरिव आर्थिक तरतूद करण्याऐवजी महामंडळांसाठी केलेल्या तरतूदी म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. ज्या सवलती दिल्या आहेत त्या केवळ दिखावा असून, यातून समाजाच्या हातात काहीही येणार नाही. ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको आहे. फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे असून, सगळ्यांना सामान न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचे ते म्हणाले. 
    कोरोना संसर्गात पुणे क्रमांक एकवर असणे हे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी असल्याने आम्ही सांगितलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करत असून, कोरोना आपत्तीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 

आम्ही करुन दाखवलं' अशा आशयाची मोठमोठी होर्डिंग्स शिवसेनेनी मुंबईत लावली. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी खरोखरच करुन दाखवले आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. मुंबई महापालिकेकडे पैशाची कमी नसल्याने ते मुंबईसाठी पाहिजे ती मशिनरी घेऊ शकतात. पण असे असतानाही मुंबईकर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील तर तीस-चाळीस वर्षे पालिकेत तुम्ही सत्ता उपभोगून काय केले, हा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. 
-------------------
कंगना रानौत यांचीही चौकशी व्हावी 
    कंगना रानौत ड्रगिस्ट असल्याचे बोलले जात असेल, तर तिचीही चौकशी झाली पाहिजे. आपल्या वैभवशाली चित्रपट सृष्टीत नवोदित कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याची शक्यता असल्यास कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही, असे दरेकर यांनी सांगून, ड्रग्जचे व्यसन हे फिल्म इंडस्ट्रीच्या हिताचे नाही. कंगना ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी. कंगना थोडी या देशाची वेगळी नागरिक आहे, सगळ्यांना न्याय तोच कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सर्वांना सारखा असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: 'Concession' is an apologetic attempt of the government to quell the outbreak of Maratha community: Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.