शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2015 02:50 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब नोंदवून पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे. शनिवारी पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहे.कोल्हापुरात १६ फेबु्रवारी २०१५ ला सागरमाळ परिसरात गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तपास केला आहे. पानसरे यांच्या हत्येचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल करत होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेतला. तीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आला परंतु त्याबद्दल पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. अंकित गोयल यांनी पानसरे यांच्या जबाबाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिली.उमाताई यांची प्रकृती आता सुधारली असली तरी त्यांच्या शरीराच्या एका बाजूला मार बसला आहे. त्यात फारशी सुधारणा नाही. त्यांची स्मृती सुधारली असली तरी हल्ला झाला त्यादिवशी नेमके काय घडले याबद्दल मात्र त्यांना आजही काहीच आठवत नाही. अगदीच त्रोटक माहिती त्या देत आहेत. (प्रतिनिधी)