शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

महावितरणच्या जागेत ३१८५ किलोवॅटचे ४ सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण

By appasaheb.patil | Published: July 30, 2019 7:02 PM

वीज बचतीसाठी प्रयत्न; कृषीपंपांना शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेला गती

ठळक मुद्देकृषीपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली सोलापूर जिल्ह्यात ३१८५ किलोवॅटचे चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले राज्यातील एकूण वीज वापरातील ३० टक्के विजेचा वापर कृषीक्षेत्रासाठी होत आहे

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : कृषीपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, महावितरणकडून स्वत:च्या उपकेंद्राच्या जागेत उभारण्यात येणाºया ३१८५ किलोवॅट (९.५ मेगावॅट) क्षमतेचे ४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ३१८५ किलोवॅटचे चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यातील एकूण वीज वापरातील ३० टक्के विजेचा वापर कृषीक्षेत्रासाठी होत आहे. कृषीपंपांना सद्यस्थितीत दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जातो. राज्यातील शेतकºयांची दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी आहे. परंतु वीज वितरण यंत्रणेतील वहन क्षमतेचा समतोल राखण्यासाठी एकाचवेळी राज्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. अशा प्रकारची योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेमुळे कृषीपंपांना दिवसा व माफक दरात शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त सहकार्याने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून शासकीय, गावठाण, शेतकºयांच्या खडकाळ व पडीक जमिनी आदी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु आहे.

जिल्ह्यात या ठिकाणी उभारले प्रकल्प़...च्सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वीज बचतीसाठी विविध  उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ वीज बचतीसाठी ग्राहकांचे समुपदेशन, जनजागृती, प्रचार व प्रसार करण्यात येत आहे़ वीजबचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील  कुंभारी (ता. द़ सोलापूर) १४१४  किलोवॅट, शिरवळ (ता. अक्कलकोट) ५०९ किलोवॅट तसेच पंढरपूर लिंक रोड ५९२ व भंडीशेगाव ६७० किलोवॅट (ता. पंढरपूर) असे एकूण ३१८५ किलोवॅटचे चार सौर   ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 

विजेचा वापर शेतकºयांसाठीच...- शेतकºयांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम गतीने सुरू आहे.  जिल्ह्यात सध्या ४ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच ठिकाणची कामे  प्रगतीपथावर आहेत. रात्रीऐवजी शेतकºयांना दिवसभर वीजपुरवठा करण्याचा मानस महावितरणने व्यक्त केला असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे  अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले़ 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे जिल्ह्यातील महावितरणच्या उपकेंद्र परिसरातील जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे़ आतापर्यंत चार प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित पाच प्रकल्प लवकरच पूर्ण होतील़ याठिकाणी तयार होणारी वीज शेतकºयांच्या विद्युतपंपासाठी वापरण्यात येणार आहे़ शेतीपंपाला २४ तास विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे़- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण़ 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणBaramatiबारामतीgovernment schemeसरकारी योजना