शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

८३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करा

By admin | Updated: December 24, 2014 00:47 IST

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे.

धडक सिंचन कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना नागपूर : विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे. या कार्यक्रमामुळे विदर्भातील शाश्वत सिंचन वाढणार असून या कार्यक्रमांतर्गत ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती व नागपूर विभागाची रोजगार हमी योजनेंतर्गत जवाहर विहीर योजना व धडक सिंचन विहीर योजनेसंदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. अपर मुख्य सचिव (नियोजन) के.पी. बक्षी, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, नरेगाचे आयुक्त एम. शंकर नारायणन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर वारजुरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारे, उपसचिव आर. विमला प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा शाश्वत सिंचन वाढीचा महत्त्वाचा कार्यक्रम समजून राबवा. मध्यप्रदेशमध्ये मागील तीन वर्षात तीन लाख विहिरी केल्या आहेत. त्याच धर्तीवर विदर्भात ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण करून यापुढेही कसे अधिक काम करता येईल, हे पाहावे. जनतेकडून विहिरींसाठी अधिक मागणी असल्यास ती घ्यावी. मागणीनुसार या योजनेत काही बदल करून व्यवस्थितपणे आढावा घेऊन योजना सुधारित कार्यक्रम राबवावा. (प्रतिनिधी)१५ दिवसात बैठक घेण्यात यावीजास्तीतजास्त विहिरी पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करावेत. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेले ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण होण्यासाठी येत्या १५ दिवसात बैठक घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.