स्पर्धा परीक्षा ठरत आहेत करिअरचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:06 AM2020-02-04T00:06:52+5:302020-02-04T00:07:31+5:30

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक व नकारात्मक गोष्टी बघायला मिळतात.

Competitive exams are a career path | स्पर्धा परीक्षा ठरत आहेत करिअरचा राजमार्ग

स्पर्धा परीक्षा ठरत आहेत करिअरचा राजमार्ग

googlenewsNext

- प्रा. राजेंद्र चिंचोले

केंद्रीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (वढरउ), स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टेट बँक, आय.बी.पी.एस., रेल्वे भरती मंडळे यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. वढरउद्वारे नागरी सेवा परीक्षा (उरए) ही देशातील अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा घेतली जाते. वढरउद्वारे संयुक्त संरक्षण सेवा (सी.डी.एस) परीक्षा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) परीक्षा, कंबाइन आर्म पोलीस फोर्स (असिस्टंट कमांडंट) परीक्षा, भारतीय वनसेवा (आय.एफ.एस) परीक्षा, भारतीय अभियांत्रिकी (आय.ई.एस.) परीक्षा यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे एकत्रित पदवी स्तर (सीजीएल), एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (उऌरछ), एकत्रित ग्राउंड ड्युटी (एसएससी उॠऊ) या परीक्षांमार्फत लाखावर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळते.

बँकेतील मॅनेजर, क्लार्क, विशेष अधिकारी यांच्या भरतीसाठी एस.बी.आय.पी.ओ, एस.बी.आय क्लार्क, आय.बी.पी.एस.पी.ओ, आय.बी.पी.एस.क्लार्क, आय.बी.पी.एस.स्पेशालिस्ट आॅफिसर या परीक्षा घेतल्या जातात. राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी निवडीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (टढरउ), निवड समिती यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. टढरउद्वारे राज्यसेवा परीक्षा, राज्यकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, वनसेवा, कृषिसेवा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेण्यात येतात. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून संरक्षण दलात करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. संरक्षण दलातील नोकरी हे राष्ट्रसेवेचे कार्य आहे.

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अनेक सकारात्मक व नकारात्मक गोष्टी बघायला मिळतात. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना समान संधी आहे. स्पर्धा परीक्षांच्या दिशेने वाढत जाणाऱ्या दिशाहीन गर्दीमुळे क्लासच्या माध्यमातून हजारो कोटींची उलाढाल होत आहे. आपली क्षमता, आपली पात्रता, आपल्या मर्यादा प्रत्येकाने ओळखल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ताणतणाव जाणवतो. आयुष्यातील महत्त्वाचा काळ तयारीसाठी खर्च करून बºयाच विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. कमी पदसंख्या, प्रचंड स्पर्धा, आर्थिक अडचण, वाढते वय, कुटुंबाची जबाबदारी, सामाजिक दबाव, कमी दर्जाचे काम करण्याची नसलेली मानसिकता या नकारात्मक बाजू आहेत.

यशासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, पण त्यासोबत आपला प्लॅन बी तयार ठेवावा. प्लॅन बी म्हणजे, आपण जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकलो नाही, तर दुसºया क्षेत्रातही आपल्याला चांगल्या पद्धतीने करिअर करता यावे. शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान त्यांच्याकडील कौशल्य, बुद्धिमत्ता, क्षमता, कला यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट करिअर करण्याचा प्रयत्न करावा.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास, आपल्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव, ध्येयनिश्चिती, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्न यांची जोड दिल्यास विद्यार्थी करिअरचे यशोशिखर गाठू शकतात. स्पर्धा परीक्षा हे साधन असून, अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. सरकारी अधिकारी बनून स्थिर आणि आव्हानात्मक करिअरच्या माध्यमातून देशाची व समाजाची प्रामाणिकपणे, परिणामकारक सेवा करता येते. समाजात मान, सन्मान, आदर, कीर्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते. स्पर्धा परीक्षेत परिश्रम, सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास यशाची गुरुकिल्ली आहे.

स्पर्धा परीक्षांद्वारे प्रत्येकाला आपली गुणवत्ता, आपले सामर्थ्य, आपली क्षमता, आपले कौशल्य, आपले व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी आहे. करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये वाढली आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, देशाची व समाजाची सेवा करण्याची संधी, खासगी क्षेत्रातील मंदी, यामुळे स्पर्धा परीक्षा करिअरचा राजमार्ग ठरत आहे. या स्पर्धा परीक्षांविषयी जाणून घेऊ दर पंधरा दिवसांनी...

Web Title: Competitive exams are a career path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.