शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 05:53 IST

लोकसभेला २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिला मतदानाचे प्रमाण खूप वाढले. महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात महिलांना दिलेली ५० टक्के सवलत याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मात्र, हे सरकारविरोधी मतदान असल्याचा दावा मविआचे नेते करत आहेत.

मध्यप्रदेशमध्ये भाजपने लाडकी बहीण योजना आणली व नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्ता आणण्यात या योजनेचा मोठा फायदा झाला होता.

लोकसभेला २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेला तब्बल ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१९ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ४३ लाख २५३ ने महिलांचे मतदान वाढले. त्यात  तब्बल १६.३२ टक्क्यांची वाढ झाली. लोकसभेपेक्षा विधानसभेला पुरुष मतदार मात्र २७ लाख ८० हजार इतके वाढले. महिला मतदान वाढीत हिंगोली क्रमांक एकवर आहे. तेथे २६.८४% मतदान वाढले.

दिग्गजांचेही बदलू लागले दावे...

यावेळी अनेक मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. आपण मोठ्या फरकाने जिंकणार असा दावा सुरुवातीला करणारे दिग्गजदेखील काही हजारांनी निवडून येऊ असे मतदानानंतर सांगू लागले आहेत. 

या पार्श्वभूमीवर महिलांचे मोठे मतदान निर्णायक भूमिका बजावतील, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. 

महिलांचे मतदान वाढलेले जिल्हे असे - पुणे : ५,१८,६२८ ने वाढ. ठाणे : ३,२०,५१९ ने वाढ. नाशिक :  २,६४,२७६ ने वाढ. नागपूर : २,३,०६१ ने वाढ. जळगाव : १,६८,३९७ ने वाढ, मुंबई उपनगरात १,७१,८७७ ने वाढ, अहिल्यानगरमध्ये २,२३,१८२ ने वाढ. 

काय घडले कारण?

महायुतीतील तिन्ही पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. या योजनेंतर्गत महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये दिले जातात. 

चार महिन्यांचे पैसे निवडणूक आचारसंहिता लागू करण्यापूर्वीच लाखो महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 

आता ही रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीने ही रक्कम ३ हजार रुपये करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यांमधून दिले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी