शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुमारिकेवर सामुहिक बलात्कार

By admin | Updated: July 2, 2014 22:30 IST

लोणार येथील एका कुमारिकेवर सामुहीक बलात्कार; मलकापूर येथील घटना; चौघांविरुध्द गुन्हा दाखल.

मलकापूर(बुलडाणा) : रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा बहाणा करून, लोणार येथील एका कुमारिकेवर दोघांनी सामुािक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री १0.३0 वाजता मलकापूर येथे घडली.
लोणार येथील रहिवासी असलेली २२ वर्षीय सुनिता (काल्पनिक) ही वसई (मुंबई) येथे मजुरी करते. तिची मावशी बुलडाणा येथील कारागृहामध्ये नोकरीला आहे. मावशीची न्यायालयाची तारीख असल्याने सुनिता ही मावशीचे पती विजयसिंग रामकुमारसिंग यांच्यासोबत १ जुलै रोजी बुलडाणा येथे आली होती. बुलडाणा येथून पुन्हा मुंबई येथे जाण्याकरिता सुनिता आणि विजयसिंग रामकुमारसिंग मंगळवारी रात्री ८ वाजता मलकापूर बसस्थानकावर पोहोचले. त्यावेळी ऑटोचालक सतिष वासुदेव दाणे (वय २४, रा. माता महाकालीनगर, मलकापूर), रविंद्र पांडुरंग कवळकार (वय २८, रा.हनुमाननगर, मलकापूर) आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार (वय २0, रा.संत ज्ञानेश्‍वरनगर, मलकापूर) या तिघांनी त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे सांगीतले. रेल्वे स्टेशनवर सोडून देण्यासाठी सुनिता व तिच्या मावशीचे पती शरद शालीग्राम पाटील (वय २८, रा.गणवाडी, मलकापूर) याच्या ऑटोमध्ये बसले. याच ऑटोमध्ये आरोपी सतिष वासुदेव दाणे आणि रविंद्र पांडुरंग कवळकार हेदेखील बसले; मात्र ऑटोचालकाने ऑटो रेल्वेस्टेशनकडे नेण्याऐवजी हनुमान चौकातून सरळ मुकुंद नगरकडे वेगात नेला. त्यामुळे सुनिता आणि विजयसिंग रामकुमारसिंग यांना संशय आला. त्यांनी धावत्या ऑटोमधून उडी मारली. त्यानंतर ऑटोचालक आणि त्याच्यासोबतच्या दोन आरोपींनी विजयसिंग रामकुमारसिंग यांना मारहाण केली. त्यांना जखमी अवस्थेत सोडून आरोपी सतीष दाणे व रवींद्र पांडूरंग कवळकर यांनी कुमारिकेला ऑटोरिक्षामध्ये बसवून, मुकुंद नगरजवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ऑटोचालक शरद पाटील हा आरोपींना तिथेच सोडून निघून गेला.
विजयसिंग रामकुमारसिंग यांनी ताबडतोब शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची हकीकत सांगितली. शहर पोलीसांनी नाकाबंदी करुन, आरोपींना काही तासातच अटक केली. गुन्ह्यात वापरलेला एम.एच.२८ टी ७0४ क्रमांकाचा आणि एक विनाक्रमांकाचा ऑटो, असे दोन ऑटो पोलिसांनी जप्त केले. पीडित कुमारिकेच्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी सतिष वासुदेव दाणे, शरद शालीग्राम पाटील, रविंद्र पांडुरंग कवडकार आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६ (२) (ड), ३६६, ५0६ गुन्हा दाखल केला.
** पीडित कुमारिका आणि विजयसिंग रामकुमारसिंग हे मलकापूर बसस्थानकावर गाडीच्या प्रतिक्षेत होते, तेव्हा सतिष वासुदेव दाणे, रविंद्र पांडुरंग कवळकार आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार या तिघांनी त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे सांगितले. रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी त्यांनी दोघांना शरद पाटील याच्या ऑटोत बसविले. त्याचवेळी सतीष दाणे आणि रवींद्र पांडूरंग कवळकर हे दोघेदेखील ऑटोमध्ये बसले. दिलीप उंबरकर मात्र बसला नाही. सतीष दाणे आणि रवींद्र पांडूरंग कवळकर या दोघांनी कुमारिकेवर बलात्कार केल्यानंतर, दिलीप उंबरकर हादेखील घटनास्थळी पोहोचला. त्याने कुमारिकेचा शोधही घेतला; मात्र अंधारात लपून बसल्याने ती वाचली.