शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 6:55 PM

गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे....

ठळक मुद्देयेत्या काही काळात त्या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता

पुणे : आयआयटीच्या धर्तीवर राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार सुरू असून, येत्या काही काळात त्या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.एनएसडीचे संचालक प्रा. सुरेश शर्मा यांनी ही माहिती दिली. एनएसडीतर्फे आयोजित नाट्य लेखन कार्यशाळेसाठी शर्मा पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विकेंद्रीकरण हा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रलंबित मुद्दा आहे. देशात नाट्य प्रशिक्षणासाठी केंद्रीय स्तरावरील एकच संस्था असायला हवी आणि बाकी ठिकाणी प्रादेशिक केंद्र असायला हवीत. असे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र मी त्याच्याशी सहमत नाही. एनएसडीची सध्या चार केंद्रे सुरू असली, तरी त्याला प्रादेशिक केंद्र म्हटले जाते हे योग्य नाही. दिल्ली व्यतिरिक्त अन्य आयआयटींना प्रादेशिक आयआयटी म्हटले जात नाही. गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे.     एनएसडीमध्ये पदवीनंतर प्रवेश दिला जातो. एनएसडीमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळते. मात्र इतर शाखांच्या अभ्यासक्रमात दोन वर्षांनंतर पदव्युत्तर पदवी मिळते. एनएसडीच्या चारही केंद्रात  एक वर्षांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. तो अभ्यासक्रम दोन वर्षांचा करून दिल्लीचे सेंटर केवळ स्पेशलायझेशनसाठी ठेवण्याचा विचार आहे.  एनएसडीचा अन्य राज्यांमध्ये कशा पद्धतीने विस्तार करता येऊ शकेल, या दृष्टीनेही  विचार सुरू आहे. मात्र, निश्चित काही धोरण ठरवण्यात आलेले  नाही. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), सत्यजित रे चित्रपट संस्था (एसआरएफटीआय) यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा सुरू केली आहे. त्या धर्तीवरच चार केंद्रे आणि दिल्लीतील मुख्य केंद्र्र यांतील अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेता येईल का? अशीही कल्पना आहे.    याशिवाय गेल्या काही वर्षांत मनोरंजन क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. सर्वसमावेशक नाट्य प्रशिक्षणासह स्पेशलायझेशनही महत्त्वाचे झाले आहे. नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांतून अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याने नाट्य प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाचे किमान  प्रशिक्षणही असावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमांसाठीचे पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय या अनुषंगाने अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकdelhiदिल्लीcinemaसिनेमा