शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका अद्याप दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 20:00 IST

आणखी दोन दिवस पाहावी लागणार वाट..

ठळक मुद्देअरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम होऊन दररोज न चुकता पाऊस

पुणे : दिवाळीमध्ये थंड वातावरणात अभ्यंग स्नानाचा अनुभव घेऊन देवदर्शनाला जाण्याची आपल्याकडे पुर्वापार पद्धत आहे़. यंदा मात्र भर दिवाळीत पाऊस अनुभवण्याची वेळ आली होती़. त्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम होऊन दररोज न चुकता पाऊस हजेरी लावून जात आहे़. वाढती आर्द्रता आणि समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा जोर यामुळ उत्तरेकडील वाऱ्यांना रोखले गेल्याने नोव्हेंबरचे काही दिवस सरले तरी राज्यात थंडीचा कडाका अनुभवायला मिळत नाही़. थंडीचा कडाका अनुभवण्यासाठी आणखी किमान दोन दिवस वाट पहावी लागणार आहे़. यंदा पावसाळा लांबल्यामुळे ऑक्टोबर हिटचा फटका बसला नाही़. ऑक्टोबरमध्ये जवळपास २० दिवस पावसाळी होते़. त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही़. त्यात दिवाळीच्या सुमारास अगोदर ‘क्यार’ हे महाचक्रीवादळ आले होते़. त्यानंतर आता ‘महा’ हे अति तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले़. त्याचा परिणाम आपल्याकडे पाऊस होत राहिल्याने तापमान अधिक राहिले़. अरबी समुद्रावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर असल्याने उत्तरेकडील वाºयांना अडथळा निर्माण झाला होता़. त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी तापमान वाढते राहिल्याने थंडी जाणवत नव्हती़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागता किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्व ठिकाणचे कमाल व किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने थंडी अद्याप पडलेली दिसून येत नाही़. पुणे शहरात नोव्हेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस तर सरासरी किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस असते़. मात्र, गेले काही दिवस दिवसाचे तापमान कायम अधिक रहात आले आहे़ तर रात्रीचे तापमानात सरासरीच्या तुलनेत कायम ४ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक राहिले आहे़. बुधवारी सकाळी ते २१ अंश सेल्सिअस होते़.  त्यात घट होऊन गुरुवारी सकाळी पुणे शहरात किमान तापमान १९़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ४़७ अंश सेल्सिअसने अधिक आहे़. त्यामुळे अजून शहरात थंडीचा कडाका जाणवू लागलेला नाही़. अरबी समुद्रात निर्माण झालेले महा चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या किनारपट्टीला धडकल्यानंतरही त्याचा परिणाम पुढील १२ तास जाणवणार आहे़. त्यानंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी होण्याची शक्यता आहे़. काश्मीरमध्ये बुधवारपासून बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली़. तसेच हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होऊ लागली आहे़. त्यामुळे भारताचा उत्तर भागात थंडी सुरु झाली आहे़. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर येत्या दोन दिवसात वाढण्याची शक्यता आहे़. त्यामुळे दोन दिवसानंतर राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे़.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान