शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुणे, नाशिकमधील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 23:27 IST

मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज

पुणे : राज्यात २० जानेवारीपासून पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. २२ व २३ जानेवारीनंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मालेगाव येथे १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत ७ अंशाने अधिक आहे.मराठवाड्याच्या बर्याच भागात व कोंकण गोव्याच्या काही भागात किचिंत वाढ झाली आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.येत्या दोन तीन दिवसात उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात शनिवारी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत ५ अंशांनी अधिक आहे. त्यात आता घट होऊन २१ जानेवारीला ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNashikनाशिकMumbaiमुंबई