शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा, भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल

By admin | Updated: August 18, 2016 21:12 IST

अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीजीएम) भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल दाखविला आहे़ त्यामुळे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 - अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीजीएम) भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल दाखविला आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपाच्या या महत्वाकांक्षी सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे़ पावसाळ्यानंतर लगेचच या कामाला सुरुवात होणार आहे़नरिमन पॉर्इंट ते कांदिवली असा ३३ कि़मी़ सागरी मार्ग तयार करण्याचा पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे़ पर्यावरण खात्याकडून विविध परवानगीच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प लांबणीवर पडला़ परिणामी या प्रकल्पाचा खर्च आता तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचला आहे़ त्यामुळे पालिकेने भू तांत्रिक सर्वेक्षणासाठी परवानगी मिळण्यापूर्वीच गेल्या महिन्यात सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविला होत्या़मात्र गेल्याच आठवड्यात एमसीजीएमने आवश्यक सर्व परवानगी दिल्यामुळे आॅक्टोबरपासून कोस्टल रोडच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकेल़ पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे येथील कार्टर रोडपर्यंतच्या कामाला सुरुवात होणार आहे़ भू तांत्रिक सर्वेक्षणाबरोबर या प्रकल्पात रस दाखविणाऱ्या कंपन्यांही बोलाविण्यात येणार आहे़ ठेकेदारांची परिषदकोस्टल रोड हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याने पालिकेने नुकतीच एक परिषद आयोजित केली होती़ यामध्ये ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता़ तसेच त्यांच्याकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करुन त्याची चाचपणी सल्लागारांकडून करुन घेण्यात येणार आहे़़असे होणार भू तांत्रिक सर्वेक्षणया सर्वेक्षणांतर्गत सागरी मार्ग तयार करण्यात येणाऱ्या मार्गावरील माती आणि खडकांची चाचणी करुन पुलाचे वजन ते पेलू शकतात का, याची चाचपणी केली जाईल़ या चाचणीतूनच या प्रकल्पाच्या स्थैर्यतेचा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे़* वाहतूक कोंडीमुळे पश्चिम उपनगरातून शहराकडे जाण्यास एक ते दीड तास लागतो़ सागरी मार्गाच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी हा प्रकल्प सुचविण्यात आला आहे़ त्यानुसार नरीमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंत ३३ कि़मी़ चा सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे़* सागरी मार्गासाठी समुद्रात १६० हेक्टर्स भराव टाकण्यात येणार आहे़ यापूर्वी केवळ बंदर बांधण्यासाठी अशा प्रकारचे भराव टाकण्याची परवानगी देण्यात येत होती़ मात्र रस्त्यासाठी समुद्रात भरणी टाकण्याची परवानगी मिळालेली मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे़