शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:26 IST

महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर जे बोलतो ते करून दाखविणारे सरकार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर जे बोलतो ते करून दाखविणारे सरकार आहे. मुंबईकरांच्या हिताच्या गोष्टी करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांना सुनावले.मुंबईतील गृहनिर्माणाबाबत नियम २९३ नुसार विधानसभेत झालेल्या चर्चेला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. या तिघांचेही अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघितले जाते. जो तो अंडी नेतो; पण ही कोंबडीची निगा राखणार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईकर, गिरणी कामगार, कष्टकरी जनता यांनी घाम गाळला, रक्त सांडले. त्यातून ही मुंबई मिळाली; पण त्यांचा विचार आजपर्यंत कोणीच केला नव्हता. तो विचार कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी असलेल्या अडचणी दूर करून देशात उत्तम उदाहरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अभय योजना जाहीर करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.आजोबा झाड लावतात, नातवंडांना फळे मिळतातझोपडपट्टी पुनर्विकासातून मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा विचार सर्वांत पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. युती सरकारमध्ये तो विचार प्रत्यक्षात आला. मात्र, त्यानंतर मधल्या काळात त्याला संथगती आली. आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याची फळे नातवंडांना मिळतात असे म्हणतात; पण त्याहीपेक्षा वेळ होऊ लागला. फळे लागताहेत, पण मलई कोण खातोय, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहताहेत, त्यांना घरे मिळवून देण्यासाठी या सरकारने योजना आणल्या आहेत. या सर्व योजनांबद्दल तिन्ही मंत्र्यांचे अभिनंदन करतो, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात