SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:04 IST2025-05-12T12:51:41+5:302025-05-12T13:04:04+5:30
Maharashtra SSC Result 2025 Date And Time : १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Maharashtra SSC Result 2025 Date : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डांचे निकाल जाहीर आहेत. या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे.
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.
कधी आणि कसा तपासाल निकाल?
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org आणि sscresult.mkcl.org या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. ऑनलाइन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि रोल नंबर समाविष्ट असेल.