शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालात मायबोली मराठीवर इंग्रजीची कुरघोडी!

By admin | Updated: June 18, 2014 04:54 IST

शालेय शिक्षणात प्रथम भाषा म्हणून मराठीचा आग्रह धरला जात असला, तरी नवी पिढी मातृभाषेत खूपच कच्ची असल्याचे दिसून येते.

मनोज ताजने, गोंदियाशालेय शिक्षणात प्रथम भाषा म्हणून मराठीचा आग्रह धरला जात असला, तरी नवी पिढी मातृभाषेत खूपच कच्ची असल्याचे दिसून येते. दहावी परीक्षेच्या निकालात राज्यातील नऊही विभागीय परीक्षा मंडळांमध्ये मराठीचा निकाल इतर भाषांच्या तुलनेत चांगलाच घसरला आहे. मराठी भाषेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण राज्यभरात ९४.२९ असले तरी ते इतर भाषांच्या तुलनेत सहाव्या क्रमांकावर आहे.विभागनिहाय तुलना केल्यास मराठीत सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९८.४८), तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा (८९.०८) लागला आहे.राज्यभरातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये एकूण ११ लाख ९९ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी ‘प्रथम भाषा’ म्हणून मराठीची निवड करून परीक्षा दिली. त्यापैकी ११ लाख ३१ हजार ५६ विद्यार्थी, अर्थात ९४.२९ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामीळ, तेलगू, सिंधी, बंगाली आणि पंजाबी अशा एकूण ११ भाषांना ‘प्रथम’ भाषा म्हणून निवडून विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण (टक्केवारी) इंग्रजी भाषेत आहे.इंग्रजीला प्रथम भाषा निवडून परीक्षा देणाऱ्या २ लाख ४९३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ६७४ विद्यार्थी, अर्थात ९७.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ९६.९४ टक्के विद्यार्थी गुजराती भाषेत, ९६.९० टक्के सिंधी भाषेत, ९५.८७ टक्के कन्नड भाषेत, ९४.९० उर्दू भाषेत आणि त्यानंतर सहाव्या क्रमांकावर मराठीचा (९४.२९ टक्के) क्रमांक लागतो.मातृभाषा म्हणून ज्या भाषेचा आपण गवगवा करतो त्या मराठीची ही पिछेहाट चिंतनाचा विषय ठरणार आहे. सध्या शहरीच नाही, तर ग्रामीण भागातही वाढत असलेले इंग्रजीचे फॅड आणि या भाषेची वाढलेली व्याप्ती यामुळेच इंग्रजी भाषेत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे दिसून येते.