शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शहराला गरज ‘तिसऱ्या डोळ्याची’

By admin | Updated: September 4, 2014 00:57 IST

‘युग’ हत्याकांडानंतर पुन्हा एकदा असुरक्षितता चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांचे वाढते मनोबल अकार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी

‘युग’ हत्याकांडानंतर चौका-चौकात सीसी टीव्ही कॅमेऱ्याची मागणीनागपूर : ‘युग’ हत्याकांडानंतर पुन्हा एकदा असुरक्षितता चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांचे वाढते मनोबल अकार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी तत्काळ उपायांची गरज व्यक्त होत आहे. यासोबतच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेर लावण्याला प्रथम प्राधान्य द्यावे अशी, मागणी पुन्हा एकदा समोर आली. विशेष म्हणजे ३० लाख लोकसंख्येच्या शहरात फक्त दोन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ज्याच्याकडे चोरी झाली, त्याला सीसी टीव्ही कॅमेरा का लावला नाही? असे आता पोलीसच विचारतात. कुठलीही घटना घडली तरी कुठे सीसीटीव्ही होता का, याची आधी पाहणी करतात. ‘युग’ हत्याकांडातही पोलिसांनी एका सीसी टीव्हीच्या कॅमेऱ्यातून आरोपीचे फुटेज मिळविले. यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज असल्याची जाणीव आता सर्वसामान्यांना होऊ लागली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसी टीव्ही कॅमेरे’ बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मुंबईमध्ये कॅमरे लावण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर पुणे आणि इतरही शहरात सुरू झाले. परंतु उपराजधानी अद्यापही मागे आहे. मागील काही दिवसांत पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.याला मंजुरी मिळाल्याचेही समजते. साधारण ५० कोटींच्या या कामात शहरातील १२८ चौकात सीसीटीव्ही लावले जाणार होते. परंतु अद्यापही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. शहरात सद्यस्थितीत अत्यंत संवेदनशील चौक असलेल्या गांधी गेट आणि संविधान चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु हे कॅमेरे अत्यंत साधारण आहेत. त्यांचे कार्यक्षेत्रही फक्त पुतळ्यांपर्यंतच मर्यादित आहे. उपराजधानीत दोनशेवर चौक संवेदनशील चौक म्हणून ओळखले जातात. यातील निम्म्या चौकातही सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर पोलिसांना सुरिक्षतता राखण्यासाठी मदत होईल. (प्रतिनिधी)एका चौकात हवे पाच कॅमेरेसीसी टीव्ही कॅमेऱ्यातील तज्ज्ञाने सांगितले, एका चौकात साधारण चार कॅमेरे असणे आवश्यक आहे. यात ‘६० फ्रेम रेकॉर्ड’ होणाऱ्या ‘स्पीड डोम फीक्स’ कॅमेऱ्यांसोबतच घुमता व ‘झूम’ होणाऱ्या कॅमेऱ्याची गरज आहे. कॅमेऱ्यासोबतच त्यांचे फुटेज पाहण्यासाठी एका अत्याधुनिक ‘कंट्रोल रुम’सोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात छोटी ‘कंट्रोल रुम’ असयाला हवी. यामुळे कॅमेऱ्यांचे फायदे दिसून येतील.