शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सिडको, जेएनपीटीला दणका

By admin | Updated: March 9, 2015 05:38 IST

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कारंजा परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास व मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडको, जेएनपीटी आणि ओएनजीसी यांनी स्थानिक मच्छीमारांना तब्बल

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कारंजा परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास व मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडको, जेएनपीटी आणि ओएनजीसी यांनी स्थानिक मच्छीमारांना तब्बल ९५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत़ देशात अशा प्रकाराचा सर्वाधिक दंड असल्याने हा निकाल ऐतिहासिक असल्याचे पर्यावरणवादी मानत आहेत़ रायगड जिल्ह्यातील करंजा येथील पारंपरिक मच्छीमार बचाओ कृती समितीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी आणि नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी, सीबीडी-बेलापूर, पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारचा पुनर्वसन विभाग हे प्रतिवादी होते. पारंपरिक मच्छीमार बचाओ कृती समितीच्या वतीने मच्छीमार रामदास कोळी यांच्यासह कोळी बांधवांनीच न्यायालयात आपली बाजू मांडली. याचिकेच्या  सुनावणीवेळी अन्यायग्रस्त मच्छिमार बचावकृती समितीने जिल्हाधिकारी (रायगड), राज्य मानवी हक्क संरक्षण आयोग तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायासाठी धाव घेतली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मच्छिमारांचा अर्ज फेटाळून लावावा, असा ओएनजीसी उरण प्रकल्पाच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद फेटाळला़ हरित न्यायाधिकरणासमोर नुकसान भरपाई आणि झालेली हानी भरुन काढण्यासंदर्भात मच्छिमारांनी केलेल्या मागण्यांचा वेगळ््या स्वरुपात विचार करण्याचे अधिकार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणास आहेत, असे न्या.विकास आर. किनगांवकर आणि न्या.डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने सुनावले. नुकसान भरपाईची ९५ कोटी १९ लाख २० हजार रुपयांची रक्कम १ हजार ६३० बाधीत मच्छिमार कुटुंबांना देण्यात येणार आहे़