चिपळूणकरांच्या उरात पुन्हा धडकी, मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:22 IST2021-09-06T21:21:47+5:302021-09-06T21:22:16+5:30
तहसीलदारांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चिपळूणकरांच्या उरात पुन्हा धडकी, मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा
ठळक मुद्देतहसीलदारांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चिपळूण : दुपारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी वाढू लागले आहे. अजून पाण्याने धोक्याची पातळी गाठली नसली तरी पावसाचा जोर आणि अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने चिपळूणकरांच्या उरात धडकी भरली आहे.
नगर पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाशिष्ठी नदी पात्राने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. मात्र पावसाचा जोर कायम आहे. त्यातच १० तारखेपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे चिपळूणकरांच्या मनात भीती कायम आहे.