शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Chipi Airport: चिपी विमानतळाची निमंत्रण पत्रिका आली; उद्धव ठाकरे नंबर १, नारायण राणेंचे नाव कितवे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:44 IST

chipi airport invitation card, Shiv sena vs Narayan Rane: नारायण राणे मंत्री नसताना त्यांना बोलविणार की नाही ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून बोलविणार की नाही असा दोन्ही बाजुंनी वाद सुरु होता. यावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे. 

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका (chipi airport invitation card) प्रसिद्ध झाली असून यामुळे आजवर शिवसेना (Shisena) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील क्षेयवाद संपण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे मंत्री नसताना त्यांना बोलविणार की नाही ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून बोलविणार की नाही असा दोन्ही बाजुंनी वाद सुरु होता. यावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर पहिले आहे. ठाकरेंच्या हस्तेच लोकार्पण केले जाणार आहे. तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे हे या सोहळ्याचे अध्यक्ष असतील. तर केंद्रीय लघू, सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आहे. 

सिंधुदुर्गात जवळपास एक दशकापासून चिपी विमानतळाचे काम सुरु होते. नारायण राणे काँग्रेसमध्ये मंत्री असताना या विमानतळाचे काम सुरु करण्यात आले होते. भूमीपूजन झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात हे काम रेंगाळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या काळात हे काम पूर्णत्वास गेले. यामुळे विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरु होता. नारायण राणेंना यायचे असेल तर ते दिल्लीत पहिल्या विमानात बसून येऊ शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला होता. यानंतर उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलविणार की नाही यावरून देखील मध्यंतरी वाद रंगला होता. निमंत्रण पत्रिकेत कोणाचे नाव असणार आणि कोणाचे नसणार यावरून राणेपूत्र आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, खासदार राऊत यांच्यात जुंपली होती. आज अखेर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची पत्रिका जाहीर झाली आहे. 

येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी १ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार असून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे गेल्या महिन्यातील वादंगानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.  

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना