शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेड रद्द करण्यासासाठी महागिरीवासियांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: August 24, 2016 20:42 IST

येथील महागिरी कोळीवाडय़ातील कोस्टल रिझर्व झोन (सीआरझोन ) उठविण्यासाठी महागिरीवासियांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. २३ : येथील महागिरी कोळीवाडय़ातील कोस्टल रिझर्व झोन (सीआरझेड ) उठविण्यासाठी महागिरीवासियांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. येथील उमेद फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी येथील नागरिकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक,नौपाडा मंडळ मच्छिमार सेल अध्यक्ष यशवंत कोळी आदींसह महागिरीवासीय उपस्थित होते.

गेल्या 25 ते 30 वर्षापासून ठाण्याच्या खाडी किनारी भागातील रासायनिक कंपन्यांमधील रासायन मिङ्म्रित सांडपाणी तसेच शहराचे सांडपाणी खाडीत सोडले जात असल्याने कोळी बांधवांचा पारंपारिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊन संपूर्ण व्यवसाय बंद झाला. त्यामुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोळीवाडय़ाला लगेच सीआरझेड लागू करण्यात आला. त्यामुळे विकास कामे थांबून प्रत्येकाच्या वाढत्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. शिवाय जुन्या इमारती धोकादायक झाल्याने इमारत पडल्यावर पुनर्बाधणीचे संकटदेखील प्रत्येकाच्या समोर उभे आहे.

असे असूनही कोळीवाडय़ाव्यतिरिक्त शेजारीच असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या परिसरात खाडी किनारी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून इमारत उभी केली जाते. तसेच लगतच पोलिसांच्याही शासकीय निवासस्थानाच्या इमारती उभारण्यात केल्या आहेत. तिथे मात्र सीआरझेड लागू केलेला नाही. केवळ महागिरी कोळीवाडय़ातच तो लागू केलेला आहे. त्यामुळे याठिकाणची घरेही विकसित करता येत नाहीत. ही बाब शहरातील मूळचे रहिवासी असलेल्या कोळी बांधवांवर अन्यायकारक असून त्यांच्या हक्कांवर घाला घालणारी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई ही कोळ्यांची आहे. त्यांचा विकास केला जाईल, त्यांना जादा एफ एस आय दिला जाईल, अशी घोषणा आधीच्या सरकारने केली होती. प्रत्यक्षात काही झाले नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्नी या नात्याने ठाण्यातील तमाम कोळी बांधवांच्या या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा आणि सीआरझेड रद्द करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे