शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी भागवली ‘सेल्फी’ बहाद्दरांची हौस

By admin | Updated: May 29, 2015 23:37 IST

व्यस्त दौऱ्यातही मुख्यमंत्र्यांनी सेल्फी काढू दिला, ही बाब मळणवासीय कधीच विसरणात नाहीत, एवढे मात्र नक्की!

गुहागर : व्हॉटस्अ‍ॅपच्या जमान्यात सध्या जिकडे-तिकडे सेल्फीची क्रेझ आहे. जिकडे जाऊ तिकडे स्वत:चे फोटो काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात एखादा सेलिब्रिटी समोर दिसला तर सेल्फीचे उमाळे जरा जास्तच वाढतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मळण येथील दौऱ्यातही नेमके हेच दिसले. अनेकांना मुख्यमंत्र्यांबरोबर स्वत:चा फोटो काढून घ्यायचा होता आणि फडणवीस यांनीही कोणाला नाराज न करता फोटो काढून दिले. त्यामुळे सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. गुहागर तालुक्यातील मळण येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी काही किलोमीटरचा धुळीने माखलेल्या रस्त्याचा प्रवास करून देवेंद्र फडणवीस प्रकल्पस्थळी पोहोचले. बंधाऱ्याची पाहणी केली करून ते निघत असताना मळण येथील काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना दबक्या आवाजात त्यांच्यासह फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामस्थांची इच्छा कानावर पडताच स्मितहास्य करत फडणवीस फोटोसाठी मागे वळले आणि मळण ग्रामस्थांचा चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढला गेला. व्यस्त दौऱ्यातही मुख्यमंत्र्यांनी सेल्फी काढू दिला, ही बाब मळणवासीय कधीच विसरणात नाहीत, एवढे मात्र नक्की!(वार्ताहर)