अन् मुख्यमंत्री चुकून दुस-याच्याच गाडीत बसले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:03 IST2017-11-21T16:01:32+5:302017-11-21T16:03:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली.

अन् मुख्यमंत्री चुकून दुस-याच्याच गाडीत बसले !
अहमदाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पण अमित शाह यांची भेट घेऊन परतताना स्वतःच्या गाडीत बसण्याऐवजी मुख्यमंत्री दुस-याच गाडीत बसले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीबद्दलच चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यामुळे पत्रकारांना चुकवत निघालेले फडणवीस हे घाईत चुकून दुस-याच गाडीत जाऊन बसले. मात्र, गाडीत बसल्यावर ड्रायव्हर चुकीचा असल्याचं लक्षात आलं आणि आपण दुस-या गाडीत बसल्याचं मुख्यमंत्र्यांना समजलं, त्यानंतर त्यांनी गाडीतून काढता पाय घेतला.
अमित शाहांची भेट घेण्यासाठी अहमदाबादला जाण्यापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. नारायण राणे यांनी या भेटीला दुजोरा दिला. पण दोघांमध्ये काय चर्चाझाली याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.