मुख्यमंत्र्यांनी क्रांतिदिन टाळला

By Admin | Updated: August 11, 2015 02:15 IST2015-08-11T02:15:25+5:302015-08-11T02:15:25+5:30

चले जाव’ला संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरुजी यांचा विरोध होता. म्हणूनच आॅगस्ट क्रांती दिनाला मुंबईत हजर राहणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले, अशी टीका

The Chief Minister avoided the Revolutionary Day | मुख्यमंत्र्यांनी क्रांतिदिन टाळला

मुख्यमंत्र्यांनी क्रांतिदिन टाळला

मुंबई : ‘चले जाव’ला संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरुजी यांचा विरोध होता. म्हणूनच आॅगस्ट क्रांती दिनाला मुंबईत हजर राहणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, २००६मध्ये तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांनी काँग्रेसचे हे आंदोलन अयशस्वी ठरल्याचे विधान केले होते. गोळवलकर आणि सुदर्शन यांच्या भूमिकांवरून या आंदोलनाप्रति आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी संघाची नकारात्मकता दिसून येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी ९ आॅगस्टला आॅगस्ट क्रांती मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करत आले आहेत. परंतु, संघाच्या विचारधारेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे हुतात्म्यांचा अवमान झाला, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister avoided the Revolutionary Day