शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य अभियंत्याला भोवली बदली

By admin | Updated: November 4, 2014 03:03 IST

मागील सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री व कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वशिल्याने एका कार्यालयीन अधीक्षकाची ठाण्याहून मुंबईला बदली

मुंबई: मागील सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री व कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वशिल्याने एका कार्यालयीन अधीक्षकाची ठाण्याहून मुंबईला बदली करणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना चांगलेच भोवले असून त्यांनी बदली केलेल्या या अधीक्षकास दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये द्यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला आहे.सा. बांधकाम विभागाच्या ठाणे परिमंडळ अधीक्षक अभियंता कार्यालयातून मुंबई येथे दक्षता पथकात रावसाहेब दौलतराव महाले यांची केलेली बदली रद्द करताना ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए. एच. जोशी यांवी अलीकडेच हा आदेश दिला. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिफारशीनुसार कोकण भवन, बेलापूर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती एस. एस. गांगर्डे ठाण्याच्या कार्यालयात बदली देता यावी यासाठी महाले यांची ठाण्याहून मुंबईला बदली केली गेली होती. आता महाले पुन्हा ठाण्यात आल्याने श्रीमती गांगर्डे यांचे काय करायचे हे संबंधित अधिकाऱ्यांनी आपसात ठरवावे, असे निर्देशही ‘मॅट’ने दिले.३१ जुलै रोजी बदली केली जाण्यापूर्वी महाले यांची जेमतेम अडीच वर्षांआधी ठाण्यात नेमणूक झाली होती. ते ‘वर्ग-क’चे अधिकारी असल्याने एका नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना सहा वर्षे ठेवणे अपेक्षित होते. त्याआधी बदली करण्यासाठी, बदली कायद्यानुसार, विशेष कारण देणे आणि वरिष्ठांची संमती घेणे गरजेचे होते. वस्तुत: कार्यालयीन सोयीसाठी असे कोणतेही खास कारण नसताना, केवळ मंत्र्यांकडून वशिला लावलेल्या श्रीमती गांगर्डे यांना हवी तेथे बदली देता यावी, यासाठी मुंबईच्या मुख्य अभियंत्यांनी या बदलीस संमती दिली होती.महाले यांच्यासाठी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी, गांगर्डे यांच्यासाठी अ‍ॅड. एस. पी. मंचेकर यांनी तर सा. बां.साठी श्रीमती के. एस. गायकवाड यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)