Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:40 IST2025-10-20T17:39:05+5:302025-10-20T17:40:36+5:30
Mumbai Airport Workers Diwali Bonus: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.

Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. या कामगारांना दिवाळीसाठी ३५ हजार रुपयांचा बोनस मिळाला आहे. लोडर, ड्रायव्हर, क्लिनर या कामगारांसाठी ३५ हजार रुपये व व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावरील सेवा पुरवठादार कंपनीच्या व्यवस्थापनासोबत दिवाळीच्या बोनस संदर्भात भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
बोनसची रक्कम दिवाळीच्या आधीच कामगारांच्या खात्यात जमा झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले व आनंद व्यक्त केला. तसेच संजय कदम, सुजित कारेकर आणि भारतीय कामगार सेनेचे आभार मानले. बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकीसाठी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस सुजित कारेकर (युनिट अध्यक्ष), नीलेश ठाणगे, नरेंद्र दळवी, सरचिटणीस सुदर्शन वारसे, खजिनदार संतोष लखमदे, सदस्य हेमंत नाईक, नितीन कदम, असोसिएशनचे सरचिटणीस हरिश्चंद्र कराळे, सदस्य रवी शेलार, रमेश रसाळ, उमेश सुरती, अनिल गुरव व इतर कमिटी सदस्य व कामगार उपस्थित होते.