शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

छत्रपती संभाजीराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे 'निशाणा'; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 20:29 IST

शेतातली उभी पिके आणि मातीही वाहून गेली आहे. मग जागेवर जाऊन पंचनामे तरी कशाचे करणार आहात?

ठळक मुद्देअतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजेंचा पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद

पुणे : राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. मी चिखल, ट्रॅक्टर, बैलगाडीमधून दौरा केला त्यामुळे माझे दौरे हे ग्राऊंडवर आहेत. फक्त हायवेवर पाहणी करून मी निघून गेलो नाही, अशा शब्दात छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकणार आहे. 

 छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मी मोठा कृषीतज्ज्ञ नाही याची मला कल्पना आहे. मी कोणावर टीकाही करणार नाही. खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महारांचा वंशज म्हणून शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली आहे. शिवरायांनी शेतीवर आलेल्या संकटावेळीही कर्जाचा विचार केलेला नव्हता. त्याचे दाखले इतिहासात आहेत. त्यामुळे या सरकारनेही कर्जाचा विचार करु नये. शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे. 

राज्य सरकारने प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. =====पंचनामे कशाचे करणार?शेतातली उभी पिके आणि मातीही वाहून गेली आहे.  मग, जागेवर जाऊन पंचनामे तरी कशाचे करणार आहात? असा प्रश्न विमा कंपन्यांना त्यांनी केला. विमा कंपन्यांनी जाचक अटी व नियम शिथिल कराव्यात अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली आहे. ==== 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार