शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: "राजकारणासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका, दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 19:51 IST

Chandrashekhar Bawankule Sharad Pawar, Maharashtra Politics: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांकडे रोख

Chandrashekhar Bawankule Sharad Pawar, Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडणार असे विधान करण्यापेक्षा शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. राजकारणासाठीमहाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना इशारा दिला. "शरद पवारांनी दंगली घडणार अशी भाषा का केली, त्यांच्या मनात काय आहे, हे माहिती नाही. परंतु उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वात महाराष्ट्रात अशी स्थिती कधीही येणार नाही", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"डॉ. आंबेडकरांच्या आरक्षणाच्या भूमिकेला काँग्रेसने कधीच मदत केली नाही. काँग्रेसने कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यांनी समाजा-समाजात वाद निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत हरविण्याचे कामही काँग्रेसनेच केले. प्रकाश आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राजकीय टीका केली आहे. फडणवीस यांना खलनायक ठरविण्याचे काम केले जात आहे. फडणवीस यांची मराठा समाजाच्या विषयात भूमिका प्रामाणिक आहे. पण त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत," अशी टीका बावनकुळे यांनी केली.

"अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. दबाव आणण्यावर तेव्हाच का कारवाई केली नाही. ते आता अडीच वर्षानंतर संभ्रम निर्माण का करत आहेत? एवढे राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार करण्यावर विचार व्हायला हवा. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून लोककल्याणकारी निर्णय घेत आहेत. महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील पुन्हा येईल आणि हे सरकार गरीब कल्याण योजना राबवत राहिल. तसेच सध्या ज्या भागात नुकसान झाले आहे, त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मदत करण्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून आम्ही जे काही करता येईल, ते काम करत आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर