‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:51 PM2024-03-18T23:51:58+5:302024-03-18T23:52:26+5:30

Nana patole Criticize Chandrashekhar Banavkule: चंद्रशेखर बावनकुळे हेच एक ‘विनोदीपात्र’ आहेत आणि भाजपात बावनकुळेंची काय किंमत आहे, हे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावरून दिसले आहे. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारीही मिळत नाही, यावरुन पक्षातील त्यांची किंमत काय, हे कळते, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

Chandrashekhar Banavkule Is a comic character in the movie, worth it in his own party? Watch it first', a group of different groups | ‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झाली होती. या सभेवर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सभेला गर्दी नव्हती, ही सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका केली होती. त्या टीकेला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे  हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. 

नाना पटोले बावनकुळेंवर टीका करताना म्हणाले की, शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी नव्हती, हास्यजत्रा होती अशी बाष्कळ बडबड करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेची गर्दी पाहण्यासाठी मोठ्या भिंगाचा चष्मा वापरुन पहावे. मोदींच्या सभेला भाडोत्री गर्दी कशी जमावावी लागली, हे यवतमाळच्या सभेने अख्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हेच एक ‘विनोदीपात्र’ आहेत आणि भाजपात बावनकुळेंची काय किंमत आहे, हे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावरून दिसले आहे. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारीही मिळत नाही, यावरुन पक्षातील त्यांची किंमत काय, हे कळते, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

काँग्रेस पक्षाने ५ न्यायासह २५ गॅरंटी दिल्या आहेत, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा या गॅरंटीतून प्रयत्न केला जाणार आहे. ही काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे, कोणत्या एका व्यक्तीची नाही, मोदींसारखी फेकूगिरी व जुमेलबाजी तर नक्कीच नाही. बावनकुळेंची पात्रता असेल तर त्यांनी नक्कीच या गॅरंटींचा अभ्यास करावा. मागील १० वर्षात भाजपा व मोदींनी काय दिवे लावलेत ते भाजपाच्या नेत्यांना व त्यांच्या विकास रथांना गावागातून लोक हुसकावून लावत आहे, यावरून दिसतेच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, पक्ष, चिन्ह चोरून नेले आहे. तथाकथीत महाशक्तीच्या नादाला लागून त्यांनी केलेले कृत्य खरे शिवसैनिक विसरणार नाहीतच पण ५० खोक्यांसाठी केलेल्या गद्दारांनी ‘हिंदु खतरे में’ म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे. लोकसभेच्या एका एका जागेसाठी भाजपाकडे भीक मागवी लागणाऱ्या व प्रत्येकवेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार काय?. बाळासाहेब ठाकरे असताना ज्या लोकांची ‘मातोश्री’च्या बाहेर स्टुलवर बसण्याची लायकी नाही तेच लोक खरी शिवसेना आमचीच, असा उसना आव आणत आहेत. खुर्चीसाठी व ५० खोक्यांसाठी आपले ‘इमान’ घाण ठेवणाऱ्या गद्दार उदय सामंत, प्रविण दरेकर या पालापाचोळ्याबद्दल बोलावे एवढी त्यांची कुवत नाही. दररोज सकाळी भोंगा वाजवण्याचे काम त्यांच्या मालकांनी त्यांना दिले आहे ते त्यांनी करावे व तेवढीच त्यांची ‘पात्रता’ आहे. शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीची ‘शक्ती’ पाहून भाजपासह गद्दारसेनेची तंतरली आहे.  देशात परिवर्तन होणार हे अटळ असून बेरोजगार होणाऱ्या भाजपा व गद्दारसेनेच्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या गॅरंटीतून एक वर्षाची ‘अप्रांटीसशिप’ नक्की मिळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Web Title: Chandrashekhar Banavkule Is a comic character in the movie, worth it in his own party? Watch it first', a group of different groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.