शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

चंद्रपूरातून PM नरेंद्र मोदींचा 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल; महाराष्ट्रात पहिलीच सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 6:28 PM

Chandrapur Loksabha Election: महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चंद्रपूर इथं सभा घेत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 

चंद्रपूर - Narendra Modi on INDIA Allaince ( Marathi News ) २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची निवडणूक आहे. एकीकडे भाजपा एनडीए आहे ज्यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणे हे ध्येय आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे. ज्याठिकाणी सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खायची हा त्यांचा हेतू आहे. इंडिया आघाडीनं देशाला नेहमी अस्थिरतेकडे नेले. स्थिर सरकार का गरजेचे असते हे महाराष्ट्राहून चांगलं कुणास ठाऊक असेल असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. 

लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची चंद्रपूर इथं महाराष्ट्रातील पहिलीच सभा होत आहे. या सभेत मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर करत राज्यातील सत्ता मिळवली. या लोकांनी घराण्याचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा असेल, कुठले कंत्राट कुणाले मिळेल, मलाईदार खाते कुणाकडे असेल याहिशोबाने त्यांनी काम केले. महाराष्ट्रात विकासाचा कुठलाही प्रकल्प आला तर आधी कमिशन आणा, नाहीतर कामाला ब्रेक लावू असं धोरण अवलंबलं असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय जेव्हा राज्यात नवीन एअरपोर्ट बनवण्याचा विषय आला तेव्हा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आधी कमिशन मागितलं. जलयुक्त शिवार योजना बंद केली. विदर्भातील विकासासाठी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मी केले त्याचाही विरोध या लोकांनी केला होता. मुंबई मेट्रो, कोकणातील रिफायनरीही रोखली. पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पाठवले तरी कमिशनसाठी गोरगरिबांना घरे देण्यापासून रोखले. आमचं सरकार येताच आम्ही सर्व योजनांना पुन्हा गती दिली. रात्रंदिवस हे सरकार काम करतेय. हेतू स्वच्छ असला की निकालही चांगला असतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा वापरली आहे. इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला स्वतंत्र करण्याची भाषा करतायेत. सनातन धर्म डेंग्यू आहे असं काही नेते म्हणतात. काँग्रेस नकली शिवसेनेला सोबत घेत त्याच नेत्यांना मुंबईत आणून भाषण करते. काश्मीर हा भारताचा भाग आहे. काश्मीर पंडितांची घरे जाळली जात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे उघडपणे काँग्रेसविरोधात आले होते. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष पूर्ण ताकदीनं पुढे घेऊन जात आहे असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-pcचंद्रपूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४