शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 10:31 IST

बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. 

नांदेड- बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. 

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टि्वट करून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. 'कर्नाटकात मराठी भाषिकांना वाईट वागणूक मिळते. हे माहीत असतानाही पाटील यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणं अयोग्य आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार असून त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा,' अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. 'आपल्या मंत्र्याने परराज्यात जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी,' असा टोलाही पवार यांनी लगावला. 

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही टीका केली आहे. 'चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला,' अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. 'महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झालं आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी,' अशी मागणी विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बेळगावजवळील गोकाक तालुक्यातील तवग येथे शुक्रवारी सायंकाळी पाटील यांच्या हस्ते दुर्गादेवी मंदीर जीर्णोद्धाराचा शुभारंभ झाला. चंद्रकांतदादांनी कन्नडमधून ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचे गीत गायलं.

ते म्हणाले, गेली ६१ वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषक एकदिलाने राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता? सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे