Chance of rain with thunderstorms to Kojagiri | कोजागिरीला गडगडाटासह पावसाची शक्यता

कोजागिरीला गडगडाटासह पावसाची शक्यता

ठळक मुद्देगेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील सुधागड पाली, जव्हार, माणगाव, वाडा येथे हलका पाऊस कोकण, गोव्यात तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या आणखी काही भागातून तर पश्चिम बंगलाच्या काही भागातून माघारी परतला आहे़. कोजागिरीला १३ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. 
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील सुधागड पाली, जव्हार, माणगाव, वाडा येथे हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात जत, पाथर्डी ६०, नेवासा, शेवगाव ४०, कवठे महाकाळ, शाहूवाडी, श्रीरामपूर २०, अहमदनगर, बार्शी, महाबळेश्वर, वेल्हे १० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात देगलूर, वाशी ४०, लातूर, मुदखेड २०, औरंगाबाद, धर्माबाद, हदगाव, कळमनुरी, लोहारा, मुखेड, उस्मानाबाद, रेणापूर, तुळजापूर १० मिमी पाऊस झाला़. विदर्भात जिवती २० व भद्रावती १० मिमी पाऊस झाला़ घाटमाथ्यावरील, कोयना ३०, अम्बोणे, शिरगाव, कोयना (नवजा) १० मिमी पाऊस पडला़. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
़़़़़़़़़़
१३ ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १४ ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे़. १५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. १६ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
़़़़़़़़
मुंबई व उपनगरात सायंकाळी अथवा रात्री आकाश अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. त्यामुळे कोजागिरीला मुंबईकरांना चंद्रदर्शन होणे अवघड राहण्याची शक्यता आहे़. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chance of rain with thunderstorms to Kojagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.