शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४ दिवसानंतर मोठ्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:45 IST

राज्यात सध्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..

ठळक मुद्देनाशिक, अहमदनगर,पुणे, कोल्हापूर, सोलापूर इथे पावसाची शक्यता.

पुणे : अरबी समुद्राहून येणारे वारे कमकुवत असल्याने तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांना जोर नसल्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नाही. ५ दिवसांनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात राज्यात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. गिरना ६०, मालेगाव ३०, अहमदनगर, पारोळा, श्रीरामपूर २०, अमळनेर, इगतपुरी, पुणे (पाषाण), सिंधखेडा १० मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद ६०, अंबड ५०, लोहा ४०, बदनापूर, गंगापूर, हिमायतनगर ३०, आष्टी, भोकरदन, बिलोली, उमारी २०, कळमनुरी, मुदखेड, परभणी, सोयेगाव, वैजापूर १० मिमी पाऊस पडला़ विदर्भात नागपूर ६०, कामठी ४०, हिंगणा, पारशिवनी, संग्रामपूर २०, अकोला, अकोट, भिवापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, चिमूर, हिंगणघाट, कुही, मारेगाव, पवनी, रामेटक, सिंधखेड राजा, उमरेड, वर्धा १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रावरुन येणारे वारे कमकुवत आहेत. त्यामुळे या वाºयांमुळे कोकणातच अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील ४ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ दिवसानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, दक्षिणेकडून येणारे जादा दाबाचे वारे क्षीण झाले आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सध्या ढगांची निर्मिती होत नाही. तसेच सह्याद्री पर्वत ओलांडून जाईल, इतका जोर वाऱ्यांमध्ये नसल्याने राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता कमी आहे.२६ ते २७ जून रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.२८ व २९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीweatherहवामान