शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा वेग मंदावला

By admin | Updated: July 31, 2014 04:09 IST

चार दिवसांपासून उसंत न घेतलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे मात्र गाड्यांचा वेग मंदावला

ठाणे : चार दिवसांपासून उसंत न घेतलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे मात्र गाड्यांचा वेग मंदावला. मुख्य मार्गावरील भांडुप, घाटकोपरसह वांगणी, कर्जत, अंबरनाथ, कल्याण या सेक्शनमध्ये ट्रॅकमध्ये पाणी तुंबल्याने हा गोंधळ झाला होता. त्यामुळे मंगळवारी पहाटेपासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लोकल २० मिनिटे ते अर्धा तास विलंबाने धावत होत्या़ मात्र, ती अखंड सुरू असल्याने प्रवाशांत समाधानाचे वातावरण होते़कर्जत मार्गावरील खोळंब्याचा फटका काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसल्याने पुण्याला जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना त्याचा काहीसा त्रास झाला. चाकरमान्यांनी मात्र पावसाचा आनंद लुटत रेल्वे सुरू आहे, यावरच आश्चर्य व्यक्त करून समाधान मानले. भांडुप-घाटकोपर भागातही बऱ्याच प्रमाणात झालेल्या पावसाने तेथील सखल भागातील ट्रॅकमध्ये (रुळांमध्ये) पावसाचे पाणी तुंबले होते. तसेच कर्जत पट्ट्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने काही काळ पाणी साचले होते. सकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू पाण्याचा निचरा झाला आणि वाहतूक पूर्वपदावर आली.त्यामुळे अप/डाऊन धीम्या-जलद दोन्ही दिशांवरील उपनगरीय लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेग मंदावला होता. सकाळपासूनच हा घोळ झाल्याने कल्याणसह ठाणे व घाटकोपर भागांत गाड्यांचे बंचिंग (कोंडी) झाली होती. त्यामुळे या ठिकाणी एकामागोमाग एक गाड्यांच्या रांगा दिसत होत्या.