केंद्रानं गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राला किती पीपीई किट दिले; आकडा पाहून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:37 PM2021-03-04T16:37:48+5:302021-03-04T16:41:15+5:30

Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September: माहिती अधिकारातून धक्कादायक तपशील समोर; महाराष्ट्राला मदत करताना केंद्र हात आखडता घेत असल्याची चर्चा

Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September | केंद्रानं गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राला किती पीपीई किट दिले; आकडा पाहून धक्का बसेल

केंद्रानं गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राला किती पीपीई किट दिले; आकडा पाहून धक्का बसेल

Next

बारामती: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सध्यादेखील राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबरपासून केंद्रानं महाराष्ट्राला एकही पीपीई किट दिलेलं नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून केलेल्या अर्जातून हा तपशील समोर आला आहे. (Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September)

सहा कोटी लोकांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार पीएफवरील व्याज दर निश्चित करण्याची शक्यता

बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगरमध्ये वास्तव्यास असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आरटीआयच्या अंतर्गत एक अर्ज केला होता. अनेकदा पत्रव्यवहार करूनही आणि इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संकटाची तीव्रता अधिक असूनही केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. टीव्ही ९ नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.



पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होऊ शकते? मोदी सरकार उत्पादन शुल्क कमी करण्याच्या विचारात - रिपोर्ट

राज्यात भाजपचं सरकार नसल्यानं केंद्र सरकार पुरेशी मदत करत नाही का, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला विशेष म्हणजे अन्य राज्यातल्या  सरकारांना केंद्र सरकार भरभरुन मदत करत असताना महाराष्ट्राला सप्टेंबर २०२० ते आजतागायत एकही पीपीई किट पुरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सापत्नपणाची वागणूक देतंय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.