शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

...सुवेग अन सुदृढ कामगिरीमुळे 'कॅट्स'ला 'प्रेसिडेंट कलर'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 9:59 AM

भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो.

नाशिक : भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो. एका विशिष्ट प्रकारचा ध्वज सन्मानाने राष्ट्रपती त्या दलाच्या परेडची मानवंदना घेत प्रदान करतात. अशाच पध्दतीचा सर्वोच्च सन्मानाने नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’ला (कॅटस्) राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गौरविणार आहेत.१९८६साली आर्मी एव्हिएशनची स्वतंत्र लष्करी हवाई दल म्हणून स्थापना करण्यात आली. युध्द व शांती काळात या एव्हिएशनच्या दलाने स्वत:ला उल्लेखनीय कामगिरीद्वारे सिध्द केले आहे. कारगिलचे युध्द असो की हिमालयातील सियाचीन, की मग राजस्थान अन् कच्छचा वाळवंटीप्रदेश अत्यंत कमालीच्या बिकट अशा नैसर्गिक वातावरणातदेखील एव्हिएशनने आपली भूमिका बजावली आहे. २९ सप्टेंबर रोजी रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गोपालपूरच्या हवाई दल केंद्राला ‘प्रेसिडेंट कलर’ने सन्मानित केले गेले. त्यानंतर गुरूवारी (दि.१०) गांधीनगरच्या ‘कॅटस्’ला हा सर्वोच्च बहुमान ते प्रदान करणार आहेत. नाशिकला कें द्र कार्यान्वित झाल्यापासून प्रशिक्षणार्थी जवनांना लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण कॅटस्च्या रन-वेवरून दिले जात आहे. लढाऊ वैमानिकांच्या अद्याप ३० तुकड्या देशसेवेत कॅ टस्मधून दाखल झाल्या आहेत. या कामगिरीची दखल घेत दस्तुरखुद्द सरसेनापती या केंद्राला सर्वोच्च सन्मान करण्यासाठी नाशिक मुक्कामी आले आहेत. यामुळे कॅटस्चे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय सैन्याचा पाठीचा कणा म्हणून लष्करी हवाई दलाला ओळखले जाते. ...म्हणून दिला जातो ‘प्रेसिडेंट कलर’वैभवशाली कामगिरीची परंपरा कायम राखली जावी व त्या दलाचे किंवा केंद्राचे मनोबल अधिकाधिक उंचावले जावे, यासाठी कामगिरीच्या इतिहासाचा गौरव म्हणून राष्टÑपतींकडून ‘प्रेसिडेंट कलर’ अर्थात एक विशिष्ट प्रकारचा ध्वज प्रदान करण्याची प्रथा आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरही पाळली जाते. या प्रथेला तसा इंग्रज राजवटीचा इतिहासदेखील आहे. इंग्रजांनी रोमन साम्राज्याकडून ध्वज प्रदान करण्याची प्रथा अवलंबविली होती. भूदल, वायूदल, नौदल अश तीनही संरक्षण दलाशी संबंधित संस्था व केंद्रांना हा बहुमान त्यांच्या कामगिरीच्याअधारे दिला जातो.

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवान