धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 13:30 IST2019-09-08T13:27:32+5:302019-09-08T13:30:29+5:30
तीन गाड्यांची एकत्रित धडक

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात
मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला. मुंडे मुंबईच्या दिशेनं येत असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. तीन गाड्यांची एकत्रित धडक झाल्यानं हा प्रकार घडला.
धनंजय मुंडे अपघातग्रस्त गाडीत नव्हते. ते पुढील गाडीत असल्यानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही. अपघातग्रस्त झालेल्या गाडीत दोन चालक आणि एक अंगरक्षक होता. त्यांच्या हाताला थोडासा मुका मार लागला. त्यांना गंभीर जखमा झाल्या नसल्यानं काळजी करण्याचं कारण नसल्याचं मुंडे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. अपघातातील जखमींवर संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.