चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:10 IST2025-02-25T23:08:06+5:302025-02-25T23:10:13+5:30
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा नेते आणि राज्य सकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याची बातमी आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता या कथित भेटीबाबत जयंत पाटील यांनीच मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा नेते आणि राज्य सकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याची बातमी आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता या कथित भेटीबाबत जयंत पाटील यांनीच मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावरून दिलेल्या स्पष्टीकरणात जयंत पाटील म्हणाले की, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील ४,६,९ जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. बावनकुळे यांनी संध्याकाळी ६ ची वेळ दिली होती. मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, कालच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहेत, असा संतापही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 25, 2025
वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा…
दरम्यान, राज्य सरकामधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मध्यरात्री झालेल्या या भेटीची माहिती समोर आल्यापासून चर्चांना उधाण आलं होतं.