कॅन्सर रुग्णांना मिळणार मोफत केमोथेरपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:55 IST2018-07-10T05:54:53+5:302018-07-10T05:55:18+5:30

नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

 Cancer patients will get free chemotherapy | कॅन्सर रुग्णांना मिळणार मोफत केमोथेरपी

कॅन्सर रुग्णांना मिळणार मोफत केमोथेरपी

नागपूर : नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वाची असणारी केमोथेरपी जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे काय, असा तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता.
या प्रश्नाबाबत दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, सातारा, वर्धा, अकोला, नागपूर या ११ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने केमोथेरपी युनिट चालू करण्याचे ठरवण्यात आले असून, याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येसुद्धा टप्प्याटप्प्याने असे युनिट सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Web Title:  Cancer patients will get free chemotherapy